29.4 C
Latur
Wednesday, May 14, 2025
Homeमहाराष्ट्रस्वयंघोषित हिंदू शेरनी घायाळ

स्वयंघोषित हिंदू शेरनी घायाळ

नवनीत राणांना डिवचणारे झळकले बॅनर

अमरावती : प्रतिनिधी
‘मातोश्रीवर चाल करू पाहणारी स्वयंघोषित हिंदू शेरनी घायाळ झाली’ या आशयाचे बॅनर लावून अप्रत्यक्षपणे नवनीत राणा यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सध्या या बॅनरची शहरभर जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतरही अमरावती मतदारसंघातील राजकीय परिस्थिती वेगळ्याच वळणावर गेल्याचे पाहायला मिळते आहे. अमरावतीत महायुतीतील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या दारुण पराभवानंतर महायुती आणि महाविकास आघाडीतील वाद अद्याप शमला नसल्याचे आज पुन्हा एकदा प्रकर्षाने दिसून आले आहे. त्यासाठी कारण ठरले आहे ते बडनेरा विधानसभेत झळकविण्यात आलेले बॅनर.

या बॅनरवर राजकीय स्वार्थासाठी रस्त्यावर होणारी हनुमान चालीसा बंद झाली. ‘मातोश्रीवर चाल करू पाहणारी स्वयंघोषित हिंदू शेरनी घायाळ झाली’ असा मजकूर लिहिण्यात आला आहे.
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे राज्यभरासह अमरावतीच्या बडनेरा विधानसभेतही आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहे. अमरावतीमध्ये नवनीत राणांना डिवचत आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे बॅनर शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख पराग गुडधे यांच्याकडून लावण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR