21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना ‘भारतरत्न’ जाहीर

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना ‘भारतरत्न’ जाहीर

पंतप्रधान मोदींची ट्वीट करत घोषणा

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना देशातील सर्वोच्च पुरस्कार समजला जाणारा ‘भारतरत्न’ जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा केली आहे. भाजप वाढवण्यात अडवाणींचा मोठा वाटा आहे.

नरेंद्र मोदींनी ट्वीट करत ही घोषणा केली आहे. नरेंद्र मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, मला सांगण्यास आनंद होतो की एल. के. अडवाणीजींना भारतरत्न जाहीर झाला आहे. मी अडवाणींशी बोललो आणि त्यांचे अभिनंदन केले. अडवाणी हे या काळातील सर्वाधिक आदरणीय नेते आहेत. तळागाळातून काम सुरू करत उपपंतप्रधानपदी पोहोचलेले नेतृत्व म्हणजे लालकृष्ण अडवाणी आहेत. गृहमंत्री आणि आयबी मिनिस्टर म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यामध्ये सख्य नसल्याच्या चर्चा होत्या. या पार्श्वभूमीवर अडवाणींना पुरस्कार जाहीर करून नरेंद्र मोदी हे अडवाणींना विसरले नाहीत हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. लालकृष्ण अडवाणींना पुरस्कार जाहीर करून भाजपने दोन गोष्टी साध्य केल्या आहेत. लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे नवे आयकॉन आहेत.

भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९२७ रोजी झाला. ते भारतीय जनसंघाचे नेते होते आणि १९७४ साली ते राज्यसभेवर निवडून गेले. आणीबाणीच्या कालावधीत त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. १९७७ साली जनसंघ जनता पक्षात विलीन झाल्यानंतर ते जनता पक्षात सामील झाले. १९८० साली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली आणि लालकृष्ण अडवाणी हे त्याच्या संस्थापकांपैकी एक नेते होते. १९९८ साली भाजपची सत्ता आल्यानंतर ते देशाचे गृहमंत्री झाले. तर २००२ ते २००४ या दरम्यान ते देशाचे उपपंतप्रधान बनले. १९८६ ते १९९०, १९९३ ते १९९८ आणि २००४ ते २००५ या दरम्यान ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते. लालकृष्ण अडवाणी सध्या भाजपच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR