26.9 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeपरभणीमहावितरणचा वरीष्ठ तंत्रज्ञ पितळेचे ‘पितळ’ उघड

महावितरणचा वरीष्ठ तंत्रज्ञ पितळेचे ‘पितळ’ उघड

एसीबीची कारवाई घराच्या झाडाझडतीत सापडले ७ लाखांचे घबाड

परभणी : शेतातील विद्युत मोटार करीता नवीन ट्रान्सफार्मर बसवून देण्यासाठी ३ हजार रूपयांची लाच घेताना पाथरी येथील महावितरण वरीष्ठ तंत्रज्ञ ज्ञानोबा नारायणराव पितळे (४२) यास दि. ११ फेब्रुवारी रोजी लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपीच्या घराची झडती घेतली असता ६ लाख ९५ हजार ११० रूपयांचे घबाड सापडले आहे. या प्रकरणी आरोपी पितळे यांच्या विरोधात पाथरी पोलिस स्टेशमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.

या संदर्भात तक्रारदार यांनी महावितरण पाथरी उपविभाग कार्यालय ग्रामीण शाखा १ येथील वरिष्ठ तंत्रज्ञ पितळे रा. अहिल्या नगर पाथरी यांच्या विरोधात दि. १० रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग परभणी येथे लिखित तक्रार दिली होती. या तक्रारीत तक्रारदार यांचे झरी कॅनालजवळील शेतातील विद्युत मोटार करिता असलेल्या तळेकर डीपीवर नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून देण्यासाठी आरोपी पितळे यांनी ३ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे म्हटले होते.

या तक्रारीची अनुषंगाने मंगळवारी पडताळणी केली असता आरोपीने पंचांसमक्ष तुमच्या मनाने काय द्यायचे ते द्या असे म्हणून लाचेची मागणी केली व लाच रक्कम स्विकारण्यास सहमती दर्शवली. तसेच सिमुरगव्हाण फाटा येथील मोहिनी टी हाऊस येथे दि.११ रोजी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडून ३००० रुपये लाचेची रक्कम स्वत: स्विकारली असता त्यांना लाचेच्या रकमेसह लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले. यावेळी आरोपीची झडती घेतली असता लाचेची रक्कम ३००० रुपये आणि त्या व्यतिरिक्त रोख ८००० रूपये मिळाले. तसेच आरोपीच्यार घराची झडती घेतली असता ६ लाख ९५ हजार ११० रूपये रोख मिळाले आहेत. याबाबत अधिक तपास करण्यात येणार आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग परभणी पोलिस निरीक्षक तपास अधिकारी बसवेश्वर जकीकोरे व पोलिस निरीक्षक अल्ताफ मुलाणी, एएसआय निलपत्रेवार, पो.अंमलदार शेख जिब्राईल, कल्याण नागरगोजे, नामदेव आदमे, चापोह जे.जे.कदम, नरवाडे यांच्या पथकाने केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR