24.1 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeउद्योगपहिल्यांदाच सेन्सेक्स ७९,००० आणि निफ्टी २४,००० पार

पहिल्यांदाच सेन्सेक्स ७९,००० आणि निफ्टी २४,००० पार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर मार्केट नवनवीन रेकॉर्ड करत आहे. गुरुवार दि. २७ जूनचा दिवस सेन्सेक्स आणि निफ्टीसाठी ऐतिहासिक ठरला. पहिल्यांदाच सेन्सेक्सने ७९,००० आणि निफ्टीने २४,००० चा टप्पा ओलांडला. बाजारातील या वाढीचे श्रेय आयटी आणि एनर्जी शेअर्संना जाते. आजच्या व्यवहाराअंती बीएसई सेन्सेक्स ५६९ अंकांच्या वाढीसह ७९,२४३ अंकांवर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १७५ अंकांच्या उसळीसह २४,०४४ अंकांवर बंद झाला.

आजच्या ट्रेडिंग सत्रातील या दमदार वाढीमुळे मार्केट कॅपदेखील जोरदार वाढले. बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप ४३८.६९ लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात ४३७.०२ लाख कोटी रुपयांवर आले होते. म्हणजेच, आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.६७ लाख कोटींची वाढ झाली आहे. आजच्या सत्रात आयटी शअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली. निफ्टीचा आयटी निर्देशांक २ टक्क्यांनी वाढून बंद झाला. याशिवाय ऑटो, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली. तर मीडिया, फार्मा आणि बँकिंग शेअर्समध्ये घसरण झाली. मिडकॅप शेअर्स वाढीसह बंद झाले, तर स्मॉलकॅप शेअर्स घसरणीसह बंद झाले.

वाढणारे आणि घसरणारे शेअर्स
आजच्या व्यवहारात अल्ट्राटेक सिमेंट ५.०७ टक्के, एनटीपीसी ३.१९ टक्के, जेएसडब्ल्यू स्किल २.३८ टक्के, टाटा मोटर्स २.१३ टक्के, इन्फोसिस २.०९ टक्के, टीसीएस २.०१ टक्के वाढीसह बंद झाले. तर, एल अ‍ॅन्ड टी १.१३ टक्के, सन फार्मा ०.४२ टक्के, नेस्ले इंडिया ०.२० टक्के घसरले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR