26.3 C
Latur
Sunday, May 25, 2025
Homeपरभणीशेवगाव-पाथर्डी महामार्गावर भीषण अपघात

शेवगाव-पाथर्डी महामार्गावर भीषण अपघात

राज्यमंत्री बोर्डीकरांनी केली तात्काळ मदत

परभणी : शेवगाव-पाथर्डी महामार्गावर रविवारी दुपारी भर पावसात दोन दुचाकीस्वारांचा भीषण अपघात झाला. यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले. यावेळी मार्गावरून प्रवास करत असलेल्या राज्याच्या महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हा प्रसंग लक्षात येताच त्यांनी जखमींना तात्काळ मदत केली.

घटनेदरम्यान मुसळधार पाऊस कोसळत होता. पावसाची तमा न बाळगता राज्यमंत्री बोर्डीकर यांनी अपघातस्थळी थांबत जखमींची विचारपूस केली. त्यांनी आपल्या ताफ्यातील पोलिस गाडी थांबवत ती जखमींना रुग्णालयात पाठवण्यासाठी दिली. तसेच जखमींवर तातडीने वैद्यकीय उपचार होतील यासाठी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधत आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देशही पोलिस अधिका-यांना दिले. अपघात झाल्यानंतर काही काळ महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. उपस्थित नागरिकांनी देखील मदतीसाठी पुढे येत पोलिस आणि आपत्कालीन सेवांना माहिती दिली. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

राज्यमंत्री बोर्डीकर यांचा हा संवेदनशील व तात्काळ प्रतिसाद सामाजिक जाणिवेचे उदाहरण ठरतो आहे. त्यांच्या या कृतीमुळे नागरिकांची मने जिंकली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR