28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयस्पेनमध्ये भीषण महापूर

स्पेनमध्ये भीषण महापूर

आतापर्यंत १८८ जणांचा मृत्यू ५० वर्षांतील विक्रमी पाऊस

व्हॅलेन्सिया : स्पेनमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे १८८ लोकांचा मृत्यू झाला. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व स्पेनमधील व्हॅलेन्सिया शहराला पुराचा सर्वांििधकफटका बसला. आतापर्यंत येथे १८८ लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. २९ ऑक्टोबर रोजी व्हॅलेन्सियामध्ये अवघ्या आठ तासांत १२ इंच पाऊस पडला. एवढा पाऊस वर्षभर पडतो. मुसळधार पावसामुळे अचानक पूर आला, त्यामुळे अनेकांना सुरक्षित स्थळी जाण्याची संधी मिळाली नाही.

व्हॅलेन्सिया भूमध्य समुद्राच्या किना-यावर स्थित आहे. येथे सुमारे ५० लाख लोक राहतात. स्पेनच्या अलीकडच्या इतिहासात पुरामुळे इतक्या लोकांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्पेनमध्ये यापूर्वीचा सर्वांत मोठा पूर १९७३ मध्ये आला होता. त्यानंतर १५० लोकांचा मृत्यू झाला. त्याआधी १९५७ मध्ये व्हॅलेन्सिया शहरात भीषण पूर आला होता, ज्यामध्ये ८१ लोकांचा मृत्यू झाला होता. पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी लोकांना घरीच राहण्याचा इशारा दिला आहे.

स्पेनमध्ये २ नोव्हेंबरपर्यंत आणीबाणी लागू करण्यात आली आहे. हवामान खात्याने शुक्रवारी आणखी पावसाचा इशारा दिला होता. यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. पूरग्रस्त भागात मदतकार्यासाठी लष्कराचे १००० हून अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत. मात्र, पुरेशी मदत त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. पुरामुळे रस्ते खराब झाले आहेत आणि दळणवळण आणि वीजवाहिन्यांचे नुकसान झाल्यामुळे अनेक भाग अजूनही शहरांपासून तुटलेले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR