18.8 C
Latur
Thursday, February 13, 2025
Homeमनोरंजनशाहरूखच्या ‘डंकी’चा जगभरात बोलबाला!

शाहरूखच्या ‘डंकी’चा जगभरात बोलबाला!

देशात २४० शहरांत तर परदेशात ५० ठिकाणी होणार प्रदर्शित

मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानचा ‘डंकी’ हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. ‘पठाण’ आणि ‘जवान’ या बॅक टू बॅक सुपरहिट सिनेमानंतर ‘डंकी’ या सिनेमाच्या माध्यमातून किंग खान रुपेरी पडदा पुन्हा एकदा गाजवणार आहे.

‘डंकी’ या सिनेमाचा रिलीजआधीच जगभरात बोलबाला पाहायला मिळत आहे.
शाहरूखच्या ‘डंकी’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राजकुमार हिरानी यांनी सांभाळली आहे. राजकुमार हिरानी यांच्यासोबत शाहरूखने पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे. हिरानी यांचे ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘थ्री इडियट्स’ आणि ‘पीके’ असे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. त्यामुळे आता ‘डंकी’ या सिनेमाकडून सिनेप्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत.

राजकुमार हिरानी आणि शाहरूख खानची जोडी एक छान कलाकृतीच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत आहे. त्यामुळे चांगली कलाकृती पाहण्याची प्रेक्षकांनाही प्रतीक्षा आहे. ‘डंकी’चा फर्स्ट डे फर्स्ट शो भारतातील २४० शहरांमध्ये होणार आहे. तर विदेशातील ५० ठिकाणांमध्ये या सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो होणार आहे. वीकेंडला हा आकडा ७५० च्या आसपास असू शकतो. शाहरूख खानच्या फॅनक्लबने फर्स्ट डे फर्स्ट शो संदर्भात ट्वीट केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR