27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रशाहू महाराजांना विशाळगडावर जाण्यापासून रोखले

शाहू महाराजांना विशाळगडावर जाण्यापासून रोखले

कोल्हापूर : कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील हे विशाळगडाच्या दिशेने रवाना झाले होते. यावेळी त्यांना प्रशासनाने पांढरेपाणी येथे रोखले. जमावबंदी लागू असल्याने शाहू छत्रपती यांना रोखण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी यावेळी पत्रकारांची देखील अडवणूक केली. पत्रकारांवर काठी उगारली असल्याची माहिती आहे. सतेज पाटील यांनी किमान १५ लोकांना विशाळगडावर जाऊ देण्याची मागणी केली आहे.

कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांनी काल विशाळगडाची पाहणी करणार असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे शाहू महाराज विशाळगडाच्या परिसराची करण्यासाठी रवाना झाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना पांढरेपाणी येथे रोखले. आमदार सतेज पाटील यांनी ज्यांची घरे पेटवली, वाहनांचे नुकसान झाले त्याची पाहणी करण्यासाठी जाणा-यांना रोखत आहेत. ज्यांनी नुकसान केले त्यांना काहीच करत नाही, असे सतेज पाटील म्हणाले.

शांतता प्रस्थापित करायला जात आहोत. शिधा आणला आहे, ज्यांची घरं पेटवली आहेत त्यांना मदत करायला सर्वपक्षीय लोक जात आहोत. आम्हाला केवळ १५ लोकांना तिथे जाऊद्यात, असे सतेज पाटील म्हणाले. १५ लोकांना सोडायची लोकशाहीत परवानगी नाही का असा सवाल सतेज पाटील यांनी केला.

विशाळगड परिसरात नुकसान झालेल्यांना सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देखील शाहू छत्रपती यांनी केली होती. ही घटना म्हणजे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे अपयश असल्याचे त्यांनी म्हटले होते. घटनेपूर्वी आम्ही जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांना सूचना दिल्या होत्या. हिंसाचाराबाबत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी खासदार शाहू छत्रपती यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शाहू महाराजांना विशाळगडकडे जाण्यापासून अडवणूक केली जाते ही दुर्दैवाची बाब आहे असे म्हटले. ज्या शाहूंनी देशाला समता शिकवली त्यांच्या वारसाला अडवले हा महाराष्ट्राचा अपमान आहे. ज्यांना अडवायला पाहिजे होत त्यांना अडवले नाही. हा सरकारचा प्लॅन आहे असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. काल पाठवलेले धारकरी होते, त्यांना कोणी पाठवले हे मला सांगायला लावू नका असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR