27.1 C
Latur
Thursday, November 21, 2024
Homeक्रीडाशाकिब अल हसनची निवृत्तीची घोषणा

शाकिब अल हसनची निवृत्तीची घोषणा

मिरपूर : बांगलादेशचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटर शाकिब अल हसनने कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. शाकिब अल हसन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याची अखेरची कसोटी खेळेल. सध्या शाकिब भारत दौ-यावर आहे.

२००७ च्या टी-२० वर्ल्ड कपपासून २०२४ च्या प्रत्येक वर्ल्ड कपमध्ये तो खेळला आहे. टी-२० वर्ल्ड कपमध्ये त्याच्या नावावर ५० विकेट घेण्याचा विक्रम आहे.

शाकिब अल हसन त्याची अखेरची कसोटी मिरपूरमध्ये खेळणार आहे. मात्र, शाकिबसाठी बांगलादेशमध्ये सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला अखेरची कसोटी खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. बांगलादेशमध्ये शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर मोठी उलथापालथ झाली. शाकिब हल हसनवर याच काळात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे तो देशात अद्याप परतलेला नाही. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सुरक्षेची हमी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR