25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयआता मी फाशी घेऊ का?

आता मी फाशी घेऊ का?

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर वादाला तोंड फुटले आहे. निवडणुकीत ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांच्या विजयानंतर काही कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीला रामराम ठोकला आहे. तर बजरंग पुनियाने आपला पद्म पुरस्कार परत केला आहे. यावरून कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी कडवट प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेसच्या मांडीवर बसलेल्या या कुस्तीपटूंसोबत देशातील एकही कुस्तीपटू नाही. ते विरोध करत आहेत, त्यांच्या विरोधामुळे मी आता फाशी घेऊ का? गेले ११ महिने आणि तीन दिवस चाललेल्या ग्रहणाचा फटका कुस्तीला बसला होता. आता निवडणुका झाल्या आणि जुन्या महासंघाचा पाठिंबा असलेला उमेदवार म्हणजेच आमचे समर्थक उमेदवार संजय सिंह उर्फ ​​बबलू विजयी झाले. विजय सुद्धा ४० ते ७ अशा फरकाने झाला. आता आमचे ध्येय कुस्तीचे काम पुढे नेण्याचे आहे असे ब्रिजभूषण शरण सिंह यांनी सांगितले.

याचबरोबर, साक्षी मलिकच्या निवृत्तीच्या निर्णयावर ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले जर साक्षीने कुस्तीला रामराम ठोकला असेल तर मी यात काय करू शकतो. गेल्या अनेक महिन्यांपासून ते माझ्यावर आरोप करत आहेत. त्यांना आरोप करण्याचा अधिकार कोणी दिला? आज ते कुस्ती महासंघाच्या निवडणुकीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. सरकारवर प्रश्न उपस्थित करत आहेत. काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत.

कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष संजय सिंह हे ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय आहेत. ब्रिजभूषण शरण सिंह यांचे मित्र कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झाल्यामुळे न्याय मिळण्याच्या आशा आणखी कमी झाल्या आहेत असे संजय सिंह यांच्या विजयानंतर कुस्तीपटूंचे म्हणणे आहे. त्यामुळे कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी केली होती. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंसोबत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांनी केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR