28.5 C
Latur
Friday, March 14, 2025
Homeमहाराष्ट्रशांतिगिरी महाराजांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

शांतिगिरी महाराजांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक किंवा संभाजीनगर मधून इच्छुक उमेदवार असणा-या जनार्दन स्वामी महाराजांचे शिष्य शांतिगिरी महाराज यांनी गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र नंतर त्यांना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून निमंत्रण आल्याने राज यांची भेट टाळून ते मध्यरात्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत भेटले आहे. दोघांची उद्या पुन्हा बैठक होणार असून त्यामुळे नव्या समीकरणांची नांदी ठरणार आहे.

राज ठाकरे नाशिकच्या दौ-यात असतानाच शांतिगिरी महाराज यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून दूरध्वनी आला होता आणि त्यामुळेच त्यांनी त्यांची भेट घेऊन घेण्याचे ठरवले असे शांतिगिरी महाराजांच्या भक्त परिवाराकडून सांगण्यात आले. राज्यातील सात ते आठ ठिकाणी बाबाजी भक्त परिवार हा निर्णय ठरण्याची शक्यता असून त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिांदे यांनी त्यांना जवळ केले आहे.

या दोघांमध्ये अंतिम चर्चा उद्या होणार असली तरी शांतिगिरी महाराज हे नाशिकमधून इच्छुक आहेत त्यामुळे नाशिकचे शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीचे काय असा प्रश्न आता केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR