पुणे : कान्स आणि बर्लिन नंतर आणखी एका इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक शरद गोरे यांच्या एक प्रेरणादायी प्रवास सूर्या या मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तुंग भरारी घेतली आहे. मुख्य भूमिकेत अभिनेता नितीन रतीलाल पाटील व अभिनेत्री प्राची सूर्यवंशी या नवीन चेह-यांना संधी दिली आहे. तसेच या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, संगीतकार स्वत: शरद गोरे असून चित्रपटातील त्यांच्या खलनायकाच्या भूमिकेने चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर नेले आहे.
चित्रपट क्षेत्रात जागतिक स्तरावर महत्व असलेल्या कान्स व बर्लिन या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यशस्वी ठसा उमटवल्यानंतर ग्लोबल इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये शरद गोरे यांना उत्कृष्ठ दिग्दर्शक व नितीन रतीलाल पाटील यांना उत्कृष्ठ अभिनेता हे दोन पुरस्कार मिळवून जागतिक स्तरावर मराठी चित्रपट सृष्टीचे नाव उज्ज्वल केले आहे, या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक अमोल कुंभार आणि सुनील साबळे यांनी ही अथक परिश्रम केले आहेत. तर छायांकन रवींद्र लोकरे यांनी केले आहे.