29.9 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeमहाराष्ट्रशरद मोहोळ हत्या प्रकरण : आणखी तीन आरोपींना अटक

शरद मोहोळ हत्या प्रकरण : आणखी तीन आरोपींना अटक

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. या हत्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून आणखी ३ आरोपींना अटक करण्यात आली असून आता अटकेतील आरोपींची संख्या १३ वर पोहोचली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाकडून काल रात्री ३ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. आदित्य गोळे, नितीन खैरे या दोघांसह आणखीन एका आरोपीला मोहोळ हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

नितीन आणि आदित्य या दोन आरोपींनी शरद मोहोळ हत्याप्रकरणातील मुख्य आरोपीला पैसे पुरवल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. एवढंच नव्हे तर शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर हा गोळीबाराचा सराव करताना हे तीनही आरोपी घटनास्थळावर उपस्थित होते, असेही समोर आले आहे. काल पकडण्यात आलेले तीनही आरोपी शरद मोहोळ हत्या प्रकरणात सहभागी होते.

शुक्रवार, दि. ५ जानेवारीला शरद मोहोळ याची त्याच्याच घराजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यामध्ये दोन वकिलांसह आठ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आणखी आरोपींना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी पोलिस कसून तपास करत आहेत. त्याच दरम्यान पुणे पोलिसांनी आता आणखी तीन जणांना अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने काल आणखी तिघांना ताब्यात घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR