पुणे: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार गेल्या काही दिवसांपासून दुष्काळग्रस्त भागाच्या दौ-यावर होते. दुष्काळी दौ-यावर असताना पवार यांना छातीत त्रास सुरू झाला. दोन दिवसांपूर्वी त्यांना पुण्यातील रूबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली आहे. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी शरचंद्र पवार काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करत त्यांच्या तब्यतीची विचारपूस केली. त्यांनी शरद पवार यांना विश्रांती घेण्याचा सल्लादेखील दिला आहे. सुप्रिया आता तयार आहेत. आम्ही देश सांभाळू. तुम्ही पूर्णपणे विश्रांती घ्या, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवारांना मोलाचा सल्ला दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पवार हे दुष्काळग्रस्त भागाच्या दौ-यावर होते. वातावरण बदलल्यामुळे शरद पवार यांना छातीत कफ झाला होता. त्रास होत असताना त्यांना दोन दिवसांपूर्वी रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आलं. त्यांच्या सर्व तपासणी करण्यात आल्या आहेत. शरद पवार यांची प्रकृती ठीक आहे. डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर ते रुग्णालयातून थेट मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी रवाना झाले आहेत.
















