21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रशरद पवार ४० वर्षांनी रायगडावर; पक्षाच्या ‘तुतारी’चे केले अनावरण

शरद पवार ४० वर्षांनी रायगडावर; पक्षाच्या ‘तुतारी’चे केले अनावरण

रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने नवे नाव आणि चिन्ह बहाल केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले. पक्षाच्या या नवीन चिन्हाचे अनावरण शरद पवार गटाने रायगड किल्ल्यावर केले. यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी हजर होते.

रायगड किल्ल्यावर पक्ष चिन्हाचे अनावरण करण्यासाठी शरद पवार हे तब्बल ४० वर्षांनी किल्ल्यावर आले. आधी रोप-वे आणि मग पालखीतून शरद पवारांना किल्ल्यावर नेण्यात आले. त्याठिकाणी पोवाडे आणि सांस्कृतिक कार्यक्रमासह पक्षाच्या नव्या चिन्हाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी शरद पवार म्हणाले की, सध्याचा संघर्ष हा वैचारिक संघर्ष आहे. या देशात अनेक राजे झाले, संस्थानिक झाले परंतु रयतेचा राजा एकच झाला. सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे. शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा याठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR