21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवार जातीयवादाचे विद्यापीठ

शरद पवार जातीयवादाचे विद्यापीठ

मुंबई : शिंदे से बैर नही पर देवेंद्र तेरी खैर नही… या सुप्रिया सुळेंच्या विधानावर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर संतापले असून जरांगे, शिंदे आणि पवार हे मराठा जातीचे आहेत आणि देवेंद्र फडणवीस ब्राह्मण जातीचे या लोकांचे राजकारण महाराष्ट्रातील लोकांना समजले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर बोलले पाहिजे. कारण त्यांचे नाव घेऊन महाराष्ट्रात संभ्रम निर्माण केला जातोय असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

पडळकरांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना नियोजनबद्ध पद्धतीने कसे टार्गेट केले जात आहे, त्यांच्यावर हल्ला केला जात आहे, तो हल्ला करून घेण्यासाठी काही माणसे पेरायची, विशिष्ट संघटनांना बळ द्यायचे, काही पत्रकारांना हाताशी धरायचे आणि देवेंद्र फडणवीसांवर जातीयवादातून टीका करायची. स्वत:ला पुरोगामी म्हणवून घ्यायचे आणि जेव्हा राजर्षी शाहू महाराजांचे वारस छत्रपती संभाजीराजेंना खासदारकी दिली तेव्हा पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमायचे आणि आता पेशवे छत्रपतींना नेमतायेत असे विधान द्यायचे. देवेंद्र फडणवीसांनी राज्यसभा देण्याआधी शाहू महाराजांच्या वारसांना यांनी कधीही खासदारकी दिली नव्हती असा आरोप त्यांनी केला.

त्याशिवाय महाराष्ट्रात जे जातीवादाचे विष पेरले जातंय त्याकडे जनता सुज्ञपणाने बघतेय. पवारांचा फॉर्म्युला आहे, पुरोगामीच्या बाता मारायच्या आणि जातीवादावर चर्चा घडवायच्या. देवेंद्र फडणवीस तुम्हाला पुरुन उरलेत. ते कशातच सापडत नाहीत म्हणून त्यांच्या जातीवर बोला. लहानपणापासून शरद पवारांकडून ज्या सुप्रिया सुळे शिकल्या, पवार हे जातीवादाचे विद्यापीठ आहेत. त्यामुळे लिंबाच्या झाडापासून गोड फळाची अपेक्षा करणे चुकीचे आहे तसे जसा बाप तशी लेक असा निशाणाही पडळकरांनी सुप्रिया सुळेंवर साधला.

दरम्यान, अजित पवारांनाही सहानुभूती दाखवायची नाही असे पुढे जाऊन सुप्रिया सुळे सांगतात. अजित पवार महाराष्ट्रभर लाडकी बहीण योजनेसाठी फिरतायेत आणि सुप्रिया सुळे स्वत:तील किडकी बहीण महाराष्ट्राला दाखवतायेत अशी खोचक टीकाही गोपीचंद पडळकरांनी सुप्रिया सुळेंवर केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR