नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये २५ जानेवारीपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना संघात स्थान मिळवण्यात अपयश आले आहे. या दोघांसाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद झाले का? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. दुसरीकडे खराब कामगिरी करणा-या शार्दुल ठाकूर यालाही संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.
अर्जुन पुरस्कार विजेता मोहम्मद शामी याने नुकत्याच झालेल्या वनडे विश्वचषकात शानदार कामगिरी केली होती. पण त्यानंतर त्याला दुखापतीने ग्रासले. त्यामधून तो अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे इंग्लंडविरोधात होणा-या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी त्याला संघात स्थान मिळाले नाही. मोहम्मद शामी बंगळुरूमध्ये एनसीएमध्ये दुखापतीवर काम करणार आहे. अष्टपैलू शार्दुल ठाकूर याला संघात स्थान मिळवता आले नाही. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना पुन्हा एकदा संघात स्थान मिळवता आले नाही.
ईशानलाही वगळले
ईशान किशन याला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिका दौ-यातून ईशान किशन याने मेंटल हेल्थचे कारण सांगत ब्रेक घेतला होता, पण तो दुबईत पार्ट्या करताना स्पॉट झाला. त्यामुळे बीसीसीआय ईशान किशन याच्यावर नाराज आहे. त्यामुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी ईशान याला वगळण्यात आले आहे. अफगाणिस्तानविरोधातील टी-२० मालिकेतूनही ईशान किशन याला वगळण्यात आले होते.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल (विकेटकीपर), के. एस. भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), आवेश खान.