16.7 C
Latur
Thursday, January 2, 2025
Homeमहाराष्ट्ररविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी यांना अटक; ४० शेतक-यांवर गुन्हा दाखल

रविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी यांना अटक; ४० शेतक-यांवर गुन्हा दाखल

बुलढाणा : शेतक-यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करीत असताना रविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांना पोलिसांनी अटक केली. या आंदोलनात सामिल ४० शेतक-यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

सोयाबीन आणि कापसाला दरवाढ, पीकविमा, शेतीपिकांची नुकसान भरपाई मागण्यासाठी मलकापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा देणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी आंदोलनापूर्वीच अटक केली आहे. त्यांना रात्रभर पोलीस ठाण्यात डांबले होते. त्यांची बुलढाणा जिल्हा न्यायालयाने सुटका केली असली तरी तुपकरांच्या नंतर हे आंदोलन रविकांत तुपकर यांच्या पत्नी ऍड. शर्वरी तुपकर या पुढे नेत आहेत. शेतक-यांचा हक्क मागणा-या ऍड. शर्वरी तुपकर यांच्यासह आंदोलक ४० शेतक-यांवर पोलिसांनी मलकापूर शहर पोलीस ठाणे तसेच मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांत लवकरच संबंधित शेतकरी तसेच ऍड. शर्वरी तुपकर यांना अटक करण्यात आली आहे. ज्या कलमाखाली हे गुन्हे दाखल झाले ते पाहाता पोलिसांना तुपकर दाम्पत्याला जिल्ह्याबाहेर हद्दपार करायचे का? असा सवाल शेतकरी करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR