21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयदुबईहून प्रियकरासाठी ‘ती’ आली भारतात अन् ‘तो’ फरार

दुबईहून प्रियकरासाठी ‘ती’ आली भारतात अन् ‘तो’ फरार

जालंधर : दुबईतील एक तरुणी आपल्या प्रियकराचा शोध घेत उत्तर प्रदेशात त्याच्या घरी पोहोचली. प्रेयसीला पाहताच प्रियकराच्या कुटुंबीयांनी घराला कुलूप लावून घरातून पळ काढला. प्रेयसी गेल्या ७ दिवसांपासून प्रियकराच्या घराबाहेर राहत आहे. संपूर्ण परिसरात ही घटना चर्चेचा विषय बनली आहे.

दुबौलिया पोलिस स्टेशन हद्दीतील रामनगर गावात राहणारा राजकुमार याची जालंधर, पंजाब येथील एका मुलीशी दुबईतील भेट झाली होती. तेथे दोघेही गेल्या तीन वर्षांपासून एकत्र कुकिंगचे काम करत होते. याच दरम्यान दोघेही प्रेमात पडले आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. महिनाभरापूर्वी राजकुमारने घरी आला आणि त्याने तरुणीशी बोलणे बंद केले. त्यानंतर तरुणीला काळजी वाटू लागली आणि तिचे प्रेम शोधण्यासाठी ती दुबईहून भारतात आली. ती काही दिवस लखनौच्या हरैया येथील हॉटेलमध्ये राहिली. तीन दिवस तिच्या धाकट्या बहिणीच्या घरी राहिली. यानंतर प्रियकर राजकुमारच्या घरी पोहोचली.

मरेपर्यंत वाट बघणार
प्रेयसी म्हणते की, ती मरेपर्यंत तिच्या प्रियकराची वाट पाहत राहील. उपाशी राहून ती वाट पाहत आहे. तिने प्रशासनाकडे मदतीचे आवाहनही केले आहे. तिने सांगितले की, ती तीन वर्षांपूर्वी तिच्या प्रियकराला भेटली होती. तिने त्याच्यासाठी करवा चौथचा उपवासही ठेवला. ती तिच्या प्रियकराच्या दारात दिवस काढत आहे. तिला विश्वास आहे की एक दिवस तिचा प्रियकर नक्कीच येईल आणि तिला आपल्यासोबत राहायला देईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR