मुंबई : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दोघांना अंतरिम दिलासा दिला असून यापूर्वी, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना त्यांचे घर दहा दिवसात रिकामे करण्यासाठी नोटीस पाठवली होती. यानंतर शिल्पा आणि राज कुंद्रास यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर उच्च न्यायालयाने ईडीला म्हटले की, त्यांच्या अपीलावर निर्णय होईपर्यंत त्यांच्यावर कोणतेही कारवाई करता येणार नाही.
हे प्रकरण प्रॉपर्टी अटॅचमेंटशी संबंधित आहे, ज्यामध्ये ईडीने शिल्पा आणि राज यांना मुंबई आणि पुण्यातील घरे खाली करण्याची नोटीस बजावली होती, परंतु आता पुढील आदेश येईपर्यंत त्यांना घर सोडावे लागणार नाही. २७ सप्टेंबर रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिल्पा शेट्टी आणि कुंद्रा यांना मुंबईतील जुहू येथील घर आणि पुण्यातील फार्म हाऊस १० दिवसांच्या आत रिकामे करण्याची नोटीस बजावली होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पी.के. चव्हाण यांच्या खंडपीठाने गुरुवारी याप्रकरणी निकाल देताना शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना दिलासा दिला.