27.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रशिंदेंचा मुक्काम अजूनही ‘वर्षा’वर

शिंदेंचा मुक्काम अजूनही ‘वर्षा’वर

मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेकडून पसंती देण्यात आली. ना भुतो न भविष्य असं यश २०२४ विधानसभा निवडणुकीत आले. भाजपने सर्वाधिक १३२ जागांवर विजय मिळवला. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आठवड्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांचा मुक्काम सागर बंगल्यावरच आहे. तर एकनाथ शिंदे वर्षा निवसस्थानी आहेत.

दरम्यान, महाराष्ट्राच्या मुख्मंत्र्यांचे निवासस्थान हे वर्षा बंगलाच असतो. मुख्यमंर्त्यांचे निवासस्थान असलेला ‘वर्षा’ बंगला हा कायम महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय असतो. पण देवेंद्र फडणवीस सध्या सागर बंगल्यावर राहत आहेत. मागील सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांना सागर बंगला मिळाला होता. आता या सरकारमध्ये अद्याप खातेवाटप पूर्ण झालेले नाही. खातेवाटप झाल्यानंतर बंगल्याचे वाटप केले जाईल. त्यानंतर देवेंद्र फडणवीस वर्षा निवस्थानावर जातील, असे सांगितले जात आहे.

ठाकरेंचे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि­पदाची शपथ घेतली. तेव्हापासून एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर मुक्कामी आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन ते तीन दिवसांत एकनाथ शिदे वर्षा निवास स्थान सोडणार आहेत. एकनाथ शिदे यांचे बंगल्यावरील सर्व सामान शिफ्ट करण्यात आलेय. फक्त सरकारी कामांमुळे अद्याप ते वर्षावर असल्याचे समजतेय. पुढील दोन दिवसांमध्ये एकनाथ शिंदे वर्षा निवसस्थान सोडतील.

शिंदे दोन दिवसात वर्षा बंगला सोडणार
२०१४ ते २०१९ या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी वर्षा बंगल्यावरून त्यांनी महाराष्ट्राचा गाडा हाकला होता. आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावरून महाराष्ट्रातील सूत्रे हाताळणार आहेत. देवेंद्र फडणवीस हिवाळी अधिवेशनानंतरच वर्षा बंगल्यावर येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे दोन दिवसात वर्षा बंगला सोडणार आहेत. नागपूरमध्ये होणा-या हिवाळी अधिवेशनानंतर देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर येतील, असे सूत्रांनी सांगितलेय.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR