27.2 C
Latur
Friday, November 8, 2024
Homeक्रीडाअविनाश साबळेसह ४७ खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार घोषित

अविनाश साबळेसह ४७ खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार घोषित

मुंबई : बीड ते ऑलिम्पिक असा प्रवास करणा-या अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याच्यासह अन्य ४७ जणांना या पुरस्काराने सन्मानित केले जाईल. खेळाडूंसह त्यांना धडे देणा-या प्रशिक्षकांनाही पुरस्कार जाहीर झाला. महाराष्ट्र सरकारने गुरुवारी शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली. यंदाचा महाराष्ट्र राज्याचा प्रतिष्ठित शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार दिग्गज बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे यांना घोषित जाहीर झाला.

अविनाश साबळे, दीप रामभीया, निलम घोडके, संदीप दिवे, अभिजीत त्रिपणकर, आदित्य मित्तल, शुशिकला आगाशे, प्रतिक पाटील, कशीश भराड, गिरीश काते, कुणाल कोठेकर, जान्हवी जाधव, अक्षय तरळ, रुपाली गंगावणे, चितारा विनेरकर, रुद्रांक्ष पाटील, याश्वी शाह, सुह्रद सुर्वे, दिया चितळे, श्रेयस वैद्य, श्रुती कडव, सर्वेश मेनन, सिद्धांत मोरे, पूनम कैथवास, रेनॉल्ड जोसेफ, अक्षता ढेकळे, अपूर्वी पाटील, अंकित जगताप, पंकज मोहिते.

प्रियंका इंगळे, सुयश गरगटे, अक्षया शेडगे, धर्मेंद्रकुमार यादव, कोमल वाकळे, नंदिनी साळोखे, कल्याणी जोशी, विष्णू सर्वानन, वैष्णवी पाटील, श्रीधर निगडे, श्रेया नानकर, साहिल खान, नेहा देशमुख, जयेश मोरे, पूर्वा किनरे, नितिन पवळे.

प्रदीप गंधे – जीवन गौरव पुरस्कार
उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक
पवन भोईर (जिम्नॅस्टिक्स), शुभांगी रोकडे (धनुर्विद्या), अनिल घाटे (कबड्डी), राजाराम घाग (दिव्यांग खेळाचे क्रीडामार्गदर्शक), दिनेश लाड (थेट पुरस्कार-क्रिकेट), सुमा शिरुर (थेट-पुरस्कार पॅराशूटिंग)

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR