22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूरशिव संपर्क मोहीमेचा दमाणी नगर येथे प्रारंभ

शिव संपर्क मोहीमेचा दमाणी नगर येथे प्रारंभ

सोलापूर : कोरोना सारख्या महामारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राची कुटुंब प्रमुख या नात्याने काळजी घेतली. संपूर्ण जगभर उद्धव ठाकरे यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आलं. अतिशय योग्य नियोजन करून कोरोना काळामध्ये अनेक जीव वाचवल्याबद्दल उद्धव ठाकरे यांचे सर्वत्र होत असलेले कौतुक पाहून भाजपाच्या पोटात पोटशूळ उठल्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार पाडलं.

अडीच वर्षाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्यांच्या अनेक योजनांना मंजुरी देत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलं त्याचबरोबर कोरोना काळात लॉक डाऊन मध्ये अडकलेल्या परप्रांतीय बांधवांना व्यवस्थित घरापर्यंत पोहोचवण्याची सोय मुख्यमंत्री या नात्याने अतिशय आपुलकीने केल्यामुळे बिहार उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू ओरिसा या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी उद्धव साहेबांचं अतिशय मुक्तकंठाने कौतुक केलं. त्यामुळे भाजपाची पोटदुखी वाढू लागली. गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने आश्वासनाच्या पलीकडे या राज्यामध्ये एकही काम केलेलं नाही.

सध्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात महागाईचे भाव गगनाला भिडले असून पेट्रोल डिझेल शेतकरी ,कष्टकरी, महिला, या मोदी सरकारने वाऱ्यावर सोडले असून सर्व महिलांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घराघरापर्यंत पोचवावेत असे आवाहन शिवसेना नेत्या अस्मिता गायकवाड यांनी शिव संपर्क मोहिमे दरम्यान हळदीकुंकू कार्यक्रम प्रसंगी केले. शिवसेना उपनेते अस्मिता गायकवाड यांच्या वतीने उपस्थित महिलांना हळदी कुंकू तिळगुळ व वाण देण्यात आले कार्यक्रमाचे संयोजन शिवसेना उपशहर संघटिका सुनीता लोंढे यांनी केले यावेळी उपशहर संघटिका प्रीती नायर उमा केत, जयश्री पाटील उज्वला देवकुळे गीता बाबर संगीता राऊत राजश्री साळुंखे संगीता देवकुळे यशोदा जाधव सुजाता गिरीज मीना लेंडवे, भाग्यश्री मंगरुळे शांता अंकुश कलावती कोळेकर ज्योती पाटील सुमन रुपनर आशा मोरे जयश्री शिंदे समृद्धी लोंढे उज्वला , माने आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, या शिव संपर्क मोहिमेच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन महिलांना भेटणार तिथे नागरिकांना भेटणार असल्याचे व त्यांच्या अडचणी व त्यांचे प्रश्न जाणून घेणार असल्याचे शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी सांगितले

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR