22.5 C
Latur
Sunday, November 3, 2024
Homeसोलापूरशिवसेना सोलापूर जिल्हा महिला संघटक पदी वंदना पंत यांची निवड

शिवसेना सोलापूर जिल्हा महिला संघटक पदी वंदना पंत यांची निवड

बार्शी : शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांच्या हस्ते शिवसेना सोलापूर जिल्हा महिला संघटकपदी वंदना पंत यांची निवड करण्यात आली. शनिवार 9 डिसेंबर रोजी तारखेला शिंदे गटाची मीटिंग रेस्ट हाउसमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी महेश नाना साठे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष चरणराज चवरे, महिला अध्यक्ष मुबिना मुलाणी, महिला व शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी वंदना पंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे, संपर्क प्रमुख शिवाजी सावंत व सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या योजनांची माहिती महिलांपर्यंत पोहचवून महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणून महिलांना विविध प्रकारच्या व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करून वरीष्टांनी दिलेली जबाबदारी सार्थकी लावणार असल्याचे सांगितले. शिवसेना सोलापूर जिल्हा महिला संघटकपदी वंदना पंत यांची निवड झाल्याने महिलांमधून आनंद व्यक्त होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR