करमाळा : प्रतिनिधी
शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक एकजुटीने काम करत असून येणार काळात जिल्ह्यातील सर्व निवडणुका शिवसेना सर्व ताकतीने लढवली असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या संघटना बांधणी संदर्भात बोलताना महेश चिवटे म्हणाले की,
सोलापूर जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात विक्रमी आरोग्य शिबीर झाले असून या माध्यमातून जवळपास 15 लाख रुग्णांची तपासणी केली आहे. आषाढी वारी व कार्तिकी वारी निमित्ताने पंढरपूर येथे आलेले आरोग्य शिबिराची नोंद संपूर्ण महाराष्ट्राने घेतले आहे.जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून प्राध्यापक सावंत यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक मतदारसंघात निधी मिळून दिला जात आहे.
आदिनाथ साखर कारखाना वाचवण्यासाठी प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी सुमारे 12 कोटी रुपयांची मदत केली आहे. गेली २५ ते ३० वर्ष प्राध्यापक शिवाजीराव सावंत शिवसेनेचा प्रवाहात असून संपूर्ण जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील शिवसैनिकांचा त्यांचा परिचय आहे.प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांचे नेतृत्वाखाली येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुका ताकतीने लढविल्यात जाणार आहेत.
देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी विराजमान करणे व मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांना विराजमान करणे हे स्वप्न उराशी घेऊन प्रत्येक शिवसैनिक काम करत असल्याचे सांगितले.लवकरच सोलापूर जिल्हा शिवसैनिकांचा मेळावा घेण्यात येणार असून या मेळाव्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार असल्याची माहिती महेश चिवटे यांनी दिली