नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज (दि.१९) देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे, असे त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. दूरदर्शी नेते, निर्भीड योद्धे, संस्कृतीचे रक्षक आणि सुशासनाचे मूर्त रूप, त्यांचे जीवन अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.’
पीएम मोदी यांनी मराठीमध्ये एक्स पोस्ट करत शिवाजी महराजांना अभिवादन केले आहे. या सोबतच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि पराक्रम सांगणारा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. दूरदर्शी नेते, निर्भीड योद्धे, संस्कृतीचे रक्षक आणि सुशासनाचे मूर्त रूप , त्यांचे जीवन अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.