25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रशिवरायांची वाघनखे आता एप्रिल-मेमध्ये महाराष्ट्रात येणार

शिवरायांची वाघनखे आता एप्रिल-मेमध्ये महाराष्ट्रात येणार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध ज्या वाघनखांनी केला, तीच वाघनखं भारताला परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर ती वाघनखे आता महाराष्ट्रात दाखल होणार आहेत. एप्रिल किंवा मेमध्ये वाघनखे महाराष्ट्रात येतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे नोव्हेंबर महिन्यातच राज्यात येणार असल्याचा दावा, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. तर जानेवारीमध्ये आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, ब्रिटन सरकारकडून प्रक्रिया सुरू असल्याने याला विलंब झाला आहे. आता एप्रिल किंवा मे महिन्यात वाघनखांचा मुहूर्त ठरला असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी ही वाघनखे महाराष्ट्रात आणण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.

शिवाजी महाराजांनी १५ नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता. अफजलखानाचा वध केल्यानंतर शिवरायांना आदिलशाहीला नामोहरम करण्यासाठी बळ मिळाले होते.

दरम्यान, शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध ज्या वाघनखांनी केला होता, ती वाघनखे ब्रिटनमधून परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार आग्रही आहे. ती वाघनखे सध्या ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात आहेत. सर्व काही ठरल्याप्रमाणे घडले तर या वर्षीच ही वाघनखे भारतात परत आणण्यात येतील, असे सुधीर मुनगंटीवार होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR