22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रगोंदियात शिवशाही बस उलटून ८ ठार

गोंदियात शिवशाही बस उलटून ८ ठार

अनेक गंभीर जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

गोंदिया : गोंदियामध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या बचाव कार्य सुरु असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ नागपुरहून गोंदियाकडे येत असलेली शिवशाही बस उलटली. या अपघातात ८ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी पोलिस आणि प्रशासन दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, गोंदिया एसटी अपघातातील मृतांना तातडीने १० लाख रुपयांची मदत देण्याचे काळजीवाहू मुख्यमत्र्यांनी परिवहन प्रशासनाला आदेश दिले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR