29 C
Latur
Saturday, March 2, 2024
Homeमहाराष्ट्रप्रजासत्ताकदिनी राजपथावर अवतरणार शिवशाही

प्रजासत्ताकदिनी राजपथावर अवतरणार शिवशाही

चित्ररथात झळकणार पाटणबोरीत तयार झालेली शिल्पे

यवतमाळ : राजधानी दिल्लीत राजपथावर उद्या प्रजासत्ताकदिनी अर्थात २६ जानेवारी रोजी होणा-या पथसंचलनात ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ चित्ररथ दिसणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या देखाव्यावरील संपूर्ण शिल्प यवतमाळ जिल्ह्यात तयार करण्यात आले आहे. त्यामुळे यवतमाळचे नाव राजधानी दिल्लीतही कोरले जाणार आहे.

प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या कर्तव्यपथावर यंदा ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ पाहायला मिळणार आहे. शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जिल्ह्यातील कलावंतांनी या चित्ररथातील शिल्प साकारले. चित्ररथाची पहिली झलक कर्तव्यपथावरील (दिल्ली) तालमीमध्ये अवघ्या देशाला पाहायला मिळाली. चित्ररथ साकारणा-या कलावंतांमध्ये यवतमाळ जिल्ह्यामधील कलावंतांचा मोठा वाटा आहे.

शूर स्त्रियांच्या प्रतिकृती देखील चित्ररथात
राज्याच्या चित्ररथामध्ये महाराजांचा लोकशाहीला अनुसरून असलेला राज्यकारभार अधोरेखित करण्यात आला आहे. चित्ररथाच्या दर्शनी भागात बाल शिवाजींसह माँ जिजाऊंची प्रतिकृती पाहायला मिळाली. तर, मागे महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, न्यायाचे प्रतीक तराजू, संभाजी महाराज, कामकाजात सहभागी महिला, गा-हाणे मांडणा-या महिलांची दखल घेणारे महाराज आदी दृश्यं आहेत. सोबतच, हिरकणी, दिपाऊ बांदल, सावित्री देसाई, सोयराबाई, कल्याणच्या सुभेदारांची सून अशा शिवकालीन शूर स्त्रियांच्या प्रतिकृती देखील चित्ररथात आहेत.

यवतमाळच्या स्टुडिओमध्ये साकारले शिल्प
चित्ररथ साकारताना तुषार प्रधान (यवतमाळ) आणि रोशन इंगोले (वर्धा) यांनी कला दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळली. पाटणबोरी येथे यशवंत यांच्या स्टुडिओमध्ये या चित्ररथातील शिल्प साकारले आहे.

विविध मंत्रालयांचे चित्ररथ
२६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, आर्थिक प्रगती आणि मजबूत अंतर्गत आणि बा सुरक्षा यांचे दर्शन घडवणारे राज्यांचे, केंद्रशासित प्रदेशांचे आणि विविध मंत्रालयांचे चित्ररथ दिसतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR