26.5 C
Latur
Friday, March 14, 2025
Homeमहाराष्ट्रशोभा खोटे, अनुपम खेर आणि कविता कृष्णमूर्ती यांना यंदाचा ‘पीफ' पुरस्कार

शोभा खोटे, अनुपम खेर आणि कविता कृष्णमूर्ती यांना यंदाचा ‘पीफ’ पुरस्कार

पुणे : ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे, प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर आणि कविता कृष्णमूर्ती यांना यंदाचा ‘पीफ’ पुरस्कार जाहीर झाला आहे. दि. १३ फेब्रुवारीला स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सायंकाळी ५ वाजता ’२३ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार असल्याची घोषणा आज महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी केली.

याप्रसंगी ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते, चित्रपट निवड समितीचे सदस्य अभिजित रणदिवे, उपसंचालक विशाल शिंदे (प्रोग्रॅम व फिल्म), उपसंचालक अदिती अक्कलकोटकर (आंतरराष्ट्रीय संपर्क व समन्वय) उपस्थित होते. पुणे फिल्म फौंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाची थीम ही ’शो मॅन ; राज कपूर’’ जन्मशताब्दी आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे व ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण अनुपम खेर यांना ‘पीफ डिस्टींग्वीश अवार्ड’, तर ज्येष्ठ गायिका पद्मश्री कविता कृष्णमूर्ती यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीतकार एस. डी. बर्मन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

यंदा प्रख्यात चर्मवाद्य वादक विजय चव्हाण आणि सहकारी यांच्या वादनाने उद्घाटन सोहळ्याची सुरुवात होईल. उद्घाटन सोहळ्यानंतर इटलीचा मार्गारिटा व्हिकेरिओ दिग्दर्शित ग्लोरिया, या चित्रपटाने महोत्सवाचा पडदा उघडणार आहे तर स्पेनच्या द रूम नेक्स्ट डोअर; या चित्रपटाने महोत्सवाची (क्लोजिंग फिल्म) सांगता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. त्यानंतर १३ ते २० फेब्रुवारीदरम्यान ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव रंगणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR