परभणी : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि श्री शिवाजी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन पुरुष नेटबॉल स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाच्या संघाने प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.
मंगळवार, दि.९ रोजी संपन्न झालेल्या या स्पर्धेचे उदघाटन स्वारातीम विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशेट्टी, उपप्राचार्य डॉ. रोहिदास नितोंडे, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. उत्कर्ष किट्टेकर, डॉ. अभिजीत मोरे, कैलास माने, क्रीडा संचालक डॉ.संतोष कोकीळ, प्रा.राजेसाहेब रेंगे आदी उपस्थित होते.
विजेत्या संघात कर्णधार गणेश दराडे, अजय काळे, अंकित काळे, गणेश सौदागर, अनिल डवरे, पांडुरंग हजारे, राम मिरासे, यशवंत परसोडे, मोहन शेंगोळे, रणजीत, दीपक पोटे या खेळाडूंचा समावेश होता. सदरील स्पर्धेत एकूण ६ संघांनी सहभाग घेतला होता.
अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयाने द्वितीय आणि महात्मा फुले महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला. पंच म्हणून महेश काळदाते, मनीष जाधव, ऋषिकेश काळे, शिवप्रसाद धुकसे, राहुल बिराजदार,प्रणव यादव, सुमित भुसारे काम पाहिले. विजेत्या खेळाडूंना डॉ. संतोष कोकीळ, प्रा राजेसाहेब रेंगे, कैलास माने, महेश काळदाते यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रशांत सराफ, प्रा.अतुल समिंद्रे, प्रा.अंकुश खटिंग, गणेश गरड, मुंजा वाव्हळे यांनी पुढाकार घेतला.