24.1 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeपरभणीपरभणीत श्री संत गजानन महाराज दिंडीचे जोरदार स्वागत

परभणीत श्री संत गजानन महाराज दिंडीचे जोरदार स्वागत

परभणी : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर वारीसाठी शेगाव येथून निघालेल्या श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे गुरूवार, दि. २७ जून रोजी परभणी शहरात भाविक भक्तांनी पुष्पवृष्टी करीत रांगोळ्या काढून व फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करीत जल्लोषात स्वागत केले. शहरातील वसमतरोड ठिकठिकाणी भाविकांनी पालखीतील श्री संत गजानन महाराज यांच्या मुर्तीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी श्री संत गजानन महाराज व विठू माऊलीच्या जय घोषाने संपूर्ण आसमंत दुमदुमले होते. या दिंडीतील वारक-यांसाठी ठिकठिकाणी फळ, चहा, फराळ वाटपाचे स्टॉल लावण्यात आले. दिंडीच्या या आगमनाने शहरातील संपूर्ण वातावरण भक्तीमय झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

शेगाव येथून पंढरपुरला निघालेल्या श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे काल झिरोफाटा येथे जोरदार स्वागत केल्यानंतर या पालखीने श्री क्षेत्र त्रिधारा या ठिकाणी मुक्काम केला होता. त्यानंतर गुरूवारी सकाळीच श्री क्षेत्र त्रिधारा येथून ही ंिदडी परभणीकडे मार्गस्थ झाली. परभणी शहरात आगमन होताच श्री क्षेत्र दत्तधाम या ठिकाणी दिंडीचे जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच दिंडीतील वारक-यांना चहा, फळे, फराळ वाटप करण्यात आला. त्यानंतर ही ंिदडी वसमतरोड मार्गावरून पुढे जात असताना ठिकठिकाणी भाविकांनी श्री संत गजानन महाराज यांच्या पालखी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

दुपारी ११ वाजताच्या सुमारास ही दिंडी शिवराम नगर येथे महाप्रसादासाठी थांबली. या ठिकाणी दिंडीतील वारक-यांसह भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या ठिकाणी नागरीकांनी रांग लावून श्रींचे दर्शन घेतले. यावेळी परीसरात पुजा साहित्य, फुलांचे हार, प्रसाद आंिदची दुकाने थाटली होती. तसेच लहान मुलांसाठी खेळणीचे दुकान देखील मोठ्या प्रमाणात दिसून येत होते. याशिवाय हातात, गळ्यात बांधावयाचे गंडे, विविध किचेन, फोटो देखील विक्रीसाठी उपलब्ध होते. त्यामुळे वसमतरोडवरील या परीसराला यात्रेचे स्वरूप आले होते. त्यानंतर दुपारी ही ंिदडी मोंढा येथील मुक्कामासाठी रवाना झाली.

शिवराम नगर येथून दिंडी निघाल्यानंतर पुढे वसमतरोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परीसरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तसेच विसावा कॉर्नर या ठिकाणी ंिदडीतील वारक-यांना भाविकांनी फळ, चहा व फराळ वाटप केले. यावेळी विठू नामाच्या जयघोषात हातात टाळ घेवून एक साथ ठेका धरणारे वारकरी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. तसेच हातात भगवे झेंडे घेऊन शिस्तबध्द पध्दतीने चालणारे वारकरी देखील सर्वांचे लक्ष वेधत होते. विशेष म्हणून दिंडीच्या सर्वांत पुढे असणा-या दोन अश्वारूढ वारकरी दिंडीचे वैशिष्ट्य होते. ही दिंडी परभणीतील मोंढ्या मुक्कामी राहणार असून शुक्रवारी सकाळीच ही दिंडी श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णीकडे मार्गस्थ होणार आहे. या दिंडीच्या आगमनाने शहरात विठू माऊलीच्या जयघोषासह श्री संत गजानन महाराज यांच्या जयघोषाने भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR