सोलापूर : श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर नऊ महिलांना “नारीशक्ती” पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रविवार दि. ६ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट यांनी दिली.
भवानी पेठ श्रीशैल्य नगर येथील सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुल शाळेत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य कामगार विमा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक बालरोगतज्ज्ञ डॉ.आसावरी कुलकर्णी, उत्तर तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ, अमरआयु हॉस्पिटलचे डॉ.श्वेता शहा, समाजसेविका माधुरी भुमकर, विवेकानंद पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापिका सपना असावा, परशुराम मोबाईल शाँपीचे प्रमुख रवी नावदगीकर, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुरस्काराचे हे सहावे वर्षे आहे. नवरात्रीनिमित्त आदिशक्तीच्या नऊ रूपाप्रमाणेच विविध क्षेत्रातील नऊ महिलांचा नारीशक्ती पुरस्काराने सन्मान होणार असल्याचे महेश कासट यांनी सांगितले. या सोहळ्यास सर्वानी उपस्थित रहावे, असे आवाहन रंजना ढेगले, नर्मदा कनकी, अँड ज्योती गायकवाड, शीला तापडिया, रुपा कुत्ताते, वंदना आंळगे, शुभांगी लचके, प्रियंका जाधव यानी केले आहे.
उद्योजिका वर्षा पाथरकर, पेनगोंडा कल्याणी फुड्सच्या कल्याणी पेनगोंडा (उद्योग क्षेत्र), सुरेखा झाड (वधु-वर सुचक केंद्र सेवा), शिक्षिका वैशाली अघोर (शैक्षणिक), डॉ. किर्ती कटारे (वैद्यकीय सेवा), ऍड.शितल डोके (विधी सेवा), बी.आर. न्यूजच्या पत्रकार श्रुती माने – गांधी (पत्रकारिता), नेटवर्क ऑफ सोलापूर बाय पीपल लिविंग एच आय व्ही एड्स या संस्थेच्या प्रकल्प समन्वयीका विजयश्री आमले (सामाजिक सेवा), निवेदिका ऐश्वर्या हिबारे आदी नऊ मान्यवर महिलांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.