गुवाहाटी : टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल गुवाहाटी येथे होणा-या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुस-या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. कोलकाता येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाल्याने हा निर्णय भारतासाठी मोठा तोटा मानला जात आहे.
अशा परिस्थितीत, २२ ते २६ नोव्हेंबरदरम्यान गुवाहाटी येथे खेळला जाणारा दुसरा कसोटी सामना खूप महत्त्वाचा आहे. १५ नोव्हेंबर रोजी कोलकाता कसोटीच्या दुस-या दिवशी गिलला मानेचा त्रास झाला. दिवसाच्या खेळानंतर त्याला तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. एका दिवसाच्या निरीक्षणानंतर १६ नोव्हेंबर रोजी त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
बीसीसीआयने गिलच्या दुखापतीबद्दल अपडेट दिले भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी आरोग्य अपडेटमध्ये म्हटले आहे की शुभमन गिलची प्रकृती वेगाने सुधारत आहे. तो १९ नोव्हेंबर रोजी संघासोबत गुवाहाटीला जाईल आणि वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवेल. दुस-या कसोटीसाठी त्याच्या उपलब्धतेबाबत अंतिम निर्णय नंतर घेतला जाईल.

