21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयसिद्धू मुसेवालाच्या आईने ५८व्या वर्षी दिला मुलाला जन्म

सिद्धू मुसेवालाच्या आईने ५८व्या वर्षी दिला मुलाला जन्म

चंदिगड : पंजाबमधील गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला याच्या आईने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. मुसेवालाची हत्या होऊन दोन वर्षे झाली आहेत.

त्यानंतर आयव्हीएपी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सिद्धू मुसेवालाच्या आई चरण कौर यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी एका मुलाला जन्म दिला आहे. सिद्धूचे वडील बलकौर सिंह यांनी नवजात मुलासोबतचा पहिला फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर यांनी मुलाला जन्म दिला आहे. मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी स्वत: सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी आपल्या लहान मुलाचा फोटो शेअर करताना लिहिले, ‘शुभदीपवर प्रेम करणा-या लाखो जीवांच्या आशीर्वादाने देवाने शुभच्या धाकट्या भावाला आमच्या पदरात दिले आहे. देवाच्या आशीर्वादाने बाळ आणि आई दोघेही निरोगी आहेत. सर्व हितचिंतकांच्या अपार प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे, असे देखील सिद्धू मुसेवालाच्या वडिलांनी म्हटले आहे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR