23.7 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeउद्योगचांदीने केला १ लाखाचा टप्पा पार

चांदीने केला १ लाखाचा टप्पा पार

नवी दिल्ली : सध्या सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसून येत आहे. सराफा बाजारात चांदीचा भाव एक लाख रुपयांहून अधिक होताना दिसत आहे. आज फ्युचर्स मार्केट म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर साप्ताहिक सुट्टी आहे, त्यामुळं आज भाव फ्युचर्स मार्केटमध्ये नाही तर देशांतर्गत बाजारात दिसतील. चांदीचे दर एक लाख रुपयांच्या वर आहेत. देशाची राजधानी दिल्लीत चांदी एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकली जात आहे.

आज, चांदीच्या किमतीत तीव्र वाढ झाल्यानंतर, दिल्लीतील चांदीचे दर प्रति किलो १,०१,००० रुपयांच्या वर आहेत. हैदराबादमध्ये चांदीचा दर १,०३,००० रुपये प्रति किलो आहे. केरळमध्येही चांदी १,०३,००० रुपये प्रति किलोच्या वर पोहोचली आहे. तर देशातील अनेक राज्यांमध्ये चांदी ९७,००० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. यापूर्वी ११ ऑक्टोबर रोजी चांदीच्या दरात किलोमागे २००० रुपयांची वाढ झाली होती.

चांदीचा भाव १ लाखांच्या पुढे का गेला?
देशात सोने खूप महाग झाले आहे. आता गुंतवणूकदार सोन्याबरोबरच चांदीला अधिक महत्त्व देऊ लागले आहेत. त्यामुळे सोन्यापेक्षा जास्त चांदी खरेदी करण्यात गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. यानंतर सोन्याच्या तुलनेत चांदीच्या वाढीची टक्केवारी अधिक झाली असून आज पुन्हा एकदा चांदी एक लाख रुपयांच्या वर पोहोचली आहे. चांदीचा वापर उद्योगांमध्येही केला जातो आणि सध्या चांदीमध्ये उच्च पातळी दिसून येत आहे. कारण देशात औद्योगिक उपक्रम वेगाने सुरू आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातही किंमत वाढली
आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात वाढ होत असून या वाढीचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात १.५८ टक्क्यांच्या वाढीनंतर चांदीचा दर प्रति औंस ३१.७३५ डॉलरवर आला असून सातत्याने वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR