18.3 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeमहाराष्ट्रदिशा सालियनप्रकरणी एसआयटी स्थापन

दिशा सालियनप्रकरणी एसआयटी स्थापन

नागपूर : दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना एसआयटी (रकळ) स्थापन करण्याचे लेखी आदेश देण्यात आले होते. त्यानंतर तत्काळ कार्यवाही झाली असून मुंबई पोलीस आयुक्तांनी एसआयटी स्थापन केली असून तपास अधिका-यांची नेमणूक केली आहे. मुंबई पोलिस आयुक्तांनी दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी फेरतपासाचे आदेश दिले आहेत. अप्पर पोलिस आयुक्त उत्तर विभाग राजीव जैन हे एसआयटीचे नेतृत्त्व करणार आहेत.

गेल्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी रकळ चौकशीचे आदेश दिले होते. अखेर आज मुंबई पोलिसांना एसआयटीसंदर्भात लेखी आदेश देण्यात आले आहेत. मुंबई पोलिस आयुक्तांनी दिशा सालियान मृत्यु प्रकरणी फेरतपासाचे आदेश दिले आहेत. परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त अजय बन्सल आणि मालवणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक चिमाजी आढाव यांच्या नेतृत्वात प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे. त्याशिवाय, अप्पर पोलीस आयुक्त उत्तर विभाग राजीव जैन हे टीमचं नेतृत्व करणार आहेत. यामध्ये क्राईम ब्रांच आणि इतर युनिट्सच्या तज्ञ अधिका-यांचा समावेश करण्यात येणार आहे.

दिशा सालियान हीने आत्महत्या केली असल्याचे मुंबई पोलिसांनी आपल्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले होते. त्यानंतर दिशा सालियान आत्महत्या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून सातत्याने आरोप सुरू होते. आता विशेष चौकशी स्थापन करण्यात आल्यानंतर पुन्हाने तपास होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR