27 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeराष्ट्रीयभीषण अपघातात सहा मित्र जागीच ठार

भीषण अपघातात सहा मित्र जागीच ठार

बिष्टुपूर : जगभरात नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहत करण्यात येत आहे. मात्र नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका भीषण रस्ता अपघातात सहा मित्रांचा मृत्यू झाला आहे. घटना झारखंड येथील बिष्टुपूर पोलिस स्टेशन हद्दीतील सर्किट हाउस भागात झाली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रिपोर्टनुसार, वेगात असलेल्या कारवरील नियंत्रण सुटल्याने ती पहिल्यांदा डिव्हायडरला धडकली आणि नंतर एका झाडावर आदळून उलटली. या कार दुर्घटनेत कारमधील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. धडक इतकी जबरदस्त होती की, याचा आवाज खूप दूरपर्यंत ऐकू आल्याने लोक घरातून बाहेर धावत आले.

स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले, तसेच जखमींना बाहेर काढण्यात आले. पोलिसांकडून हे तरूण कुठे पार्टी करण्यासाठी गेले होते याचा शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नव्या वर्षाच्या स्वागताची पार्टी करून हे तरूण घरी परतत असताना ही घटना घडली. रिपोर्ट्सनुसार कारमध्ये बसलेले सर्व तरुण दारूच्या नशेत होते. सकाळ होताच घटनास्थळी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान मृतदेहांना कारमधून बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. सर्व मृत तरुण हे आरआयटी पोलिस स्टेशन हद्दीतील कुलुप्तांग येथील आहेत.

या अपघातात जखमी झालेल्या रविशंकर याच्या वडिल सुनील झा यांनी सांगितले की या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे पण त्यांचा मुलगा बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त वाहानामध्ये आठ जण प्रवास करत होते. ज्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण बचावले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR