संगमनेर : प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथे चांदशावली दर्ग्याच्या घुमटाला कळस चढवण्याचे काम सुरू असतानाच अचानक घुमटाचा स्लॅब कोसळल्याने यामध्ये कंधार तालुक्यातील घोडज येथील रहिवाशी असलेल्या मामा भाचे गंभीर जखमी झाले असता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी अनीलचा तर शनिवारी सुभासचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी १८ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली होती.
कंधार तालुक्यातील घोडज येथील रहिवासी असलेले सुभाष तुकाराम नरवड वय (२७ वर्ष) आणि अनिल गोविंद तिरवड वय (२७ वर्ष) हे गंभीर जखमी झाले होते. अनिलला ससून हॉस्पिटल पुणे तर सुभाषला संगमेश्वर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गंभीर दुखापत असल्यामुळे अनिलने शुक्रवारी तर सुभाषने शनिवारी अखेरचा श्वास घेतला. घोडज येथे शुक्रवारी अनीलचे व शनिवारी सुभाषचे अंत्यसंस्कार करण्यात आले. अशी माहिती घोडज येथील पोलीस पाटील भीमराव लाडेकर यांनी दिली. तसेच तीन कामगार जखमी झाले असल्याचे समजले.
एकाच कुटुंबातील नात्याने मामा भाचे असल्यामुळे आणि एक दिवसाच्या फरकाने दोन अंत्यसंस्कार करण्यात आल्यामुळे घोडज गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत होती. अनिलला एक मुलगा तर सुभाषला एक मुलगा व एक मुलगी आहे दोघांचेही वडिलांचे छत्र पूर्वीच हरपले होते. कुटुंबाचा आधारस्तंभ हेच दोघे होते. पण काळाने अचानक दोघांचाही घात केला आणि आणि कुटुंब उघड्यावर आले त्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून या कुटुंबांना आर्थिक लाभ मिळाला तर कुटुंबाला खऱ्या अथार्ने आधार मिळेल.