28.7 C
Latur
Tuesday, March 11, 2025
Homeलातूरमांजरा साखर कारखान्याच्या गाळपास गती

मांजरा साखर कारखान्याच्या गाळपास गती

विलासनगर : प्रतिनिधी

विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या दूरदृष्टीतून उभा राहिलेल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सहकारी साखर कारखानदारीत आपला एक वेगळा ठसा निर्माण केलेला आहे. सातत्याने नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करीत कारखान्याने प्रगतीचे असंख्य टप्पे गाठले आहेत. शेतक-यांना सर्वाधिक ऊस दर देण्यापासून ते शेतक-यांचा सर्वांगिण विकासाचे उद्दिष्ट साधले आहे. शेतक-यांचा ऊस अत्याधुनिक ऊस तोडणी यंत्राने तोडला जात असल्यामुळे कारखान्याच्या गळीतास गती आली आहे.

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे कारखान्याने स्व-मालकीचे घेतलेले नवीन ५ पैकी सध्या उपलब्ध झालेले ३ ऊस तोडणी यंत्रांचे पूजन राज्याचे माजी मंत्री तथा चेअरमन सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते झाले. या वेळी राज्य साखर संघाचे सदस्य आबासाहेब पाटील, मांजराचे व्हाईस चेअरमन श्रीशैल्य उटगे, जागृती शुगरचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण मोरे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन श्रीपतराव काकडे, रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, संतशिरोमणी कारखाना संचालक शाम भोसले, सचिन पाटील, विलास कारखाना संचालक अनंत बारबोले, गुरूनाथ गवळी, सचिन दाताळ, संभाजी सूळ, सतीश पाटील, शिवाजी कांबळे, श्रीकृष्ण काळे, विकास देशमुख, मांजरा कारखाना संचालक अशोकराव काळे, तात्यासाहेब देशमुख, बंकटराव कदम, वसंतराव उफाडे, सदाशिव कदम, कैलास पाटील, ज्ञानेश्वर पवार, निळकंठ बचाटे (पवार), सचिन शिंदे, धनराज दाताळ, नवनाथ काळे, अनिल दरकसे, शेरखाँ पठाण, बाबूराव जाधव, तज्ज्ञ संचालक महेंद्रनाथ भादेकर, ज्ञानेश्वर भिसे, विशाल पाटील, कार्यकारी संचालक पंडित देसाई, कार्यलक्षी संचालक श्रीनिवास देशमुख, अधिकारी तसेच कारखान्याचे खातेप्रमुख कर्मचारी उपस्थित होते. सहकारमहर्षि दिलीपरावजी देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनात विद्यमान गळीत हंगामात मांजरा परिवारातील सर्व कारखाने योग्यरित्या सुरू असून शेतक-यांचा ऊस माशनद्वारे मोठ्या प्रमाणात तोडला जात असल्याने गाळपास गती आले असल्याचे विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून कळवण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR