25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबईतील दहीहंडी उत्सवात आतापर्यंत २३८ गोविंदा जखमी

मुंबईतील दहीहंडी उत्सवात आतापर्यंत २३८ गोविंदा जखमी

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत जन्माष्टमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या दहीहंडी उत्सव २०२४ च्या कार्यक्रमात आतापर्यंत २३८ गोविंदा जखमी झाल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. या सर्व जखमी गोविंदांना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे देखील पालिकेने नमूद केले आहे.

मुंबईत गोविंदांचा उत्साह आणि दरवर्षी होणारे अपघात लक्षात घेता पालिकेने यावर्षी दक्षता घेतली असून, केईएम रुग्णालयात जखमी गोविंदांसाठी १० राखीव खाटा ठेवण्यात आल्याचे पालिकेने जाहीर केले आहे. सोबतच ज्या जखमी गोविंदांना अस्थिरोग तज्ञांची गरज असेल, अशा ठिकाणी अस्थिरोग तज्ञ देखील तैनात ठेवण्यात आले असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR