25.8 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रबाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात आतापर्यंत ९ जणांना अटक

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात आतापर्यंत ९ जणांना अटक

मुंबई : बाबा सिद्दिकीच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने आणखी पाच आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई, कर्जत आणि डोंबिवली परिसरातून पाच आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या सर्वांचे लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध आहेत. त्याचबरोबर अटक करण्यात आलेले चार आरोपी २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत आहेत.

मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथके देशाच्या विविध भागात पाठवण्यात आली होती. ते आरोपींचा शोध घेत आहेत. शुक्रवारी त्यांना मोठे यश मिळाले. पोलिसांना विशेष माहिती मिळाली होती. त्याआधारे रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि पानवे येथे गुन्हे शाखेने छापे टाकले. या छाप्यादरम्यान पोलिसांनी कट रचून गुन्ह्याची अंमलबजावणी केल्याप्रकरणी पाच जणांना अटक केली.

बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि आमदार झीशान सिद्दीकी यांनी शुक्रवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. पोलिस अधिका-यांनी सांगितले की, झीशानच्या कुटुंबीयांना आतापर्यंत केलेल्या तपासाबाबत माहिती देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे की, या भेटीचा उद्देश झीशान यांच्या कुटुंबीयांना तपासाबाबत माहिती देणे हा होता.

दुुसरीकडे, सलमान खानच्या हत्येची योजना आखल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुखवीर उर्फ ​​सुखा आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुखाला ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सुखावर पाकिस्तानमध्ये राहणा-या डोगरच्या संपर्कात राहून त्याच्याकडून उच्च दर्जाची शस्त्रे मिळवण्याचा सौदा केल्याचा आरोप आहे. सुखाने सलमान खानच्या पनवेल फार्महाऊसची रेकी करणा-या या प्रकरणी आधीच अटक केलेल्या ५ शूटर्सना जबाबदारी दिली होती.

सुखाला पानिपत येथून अटक करण्यात आली. बुधवारी रात्री त्यांना पानिपतहून मुंबईत आणण्यात आले. ते पानिपतमधील एका खासगी हॉटेलमध्ये थांबले होते. मुंबई पोलिस सहा महिन्यांपासून सुखाचा शोध घेत होते. सलमान खानच्या फार्म हाऊसच्या रेकी प्रकरणी पाच जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR