तर बीडच्या खासदाराची चड्डी राहणार नाही

पुणे : मी जर प्रेस घेतली तर बीडच्या खासदाराची चड्डी राहणार नाही असे म्हणत खासदार बजरंग सोनवणे यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट टाकणा-या पोलिस अधिका-याची बदली करण्यात आली असून गणेश मुंडे असे बदली करण्यात आलेल्या पोलिस अधिका-याचे नाव आहे. खासदार बजरंग सोनवणेंनी आवाज उठवल्यानंतर अखेर वादग्रस्त पोलिस अधिकारी गणेश मुंडे यांची बदली करण्यात आली आहे. वादग्रस्त पोस्ट केल्या प्रकरणी तडकाफडकी बदली झाल्याचे बोलले जात आहे.

गणेश मुंडे यांची पुणे नियंत्रण कक्षाला बदली करण्यात आली आहे. खासदार बजरंग सोनावणे यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून या पोलिस अधिका-यावर रोष व्यक्त करण्यात येत होता. व्हाट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. दरम्यान, आता राज्य सरकारने त्यांना बीड जिल्ह्यातून हटवले असून त्यांची पुण्यात बदली करण्यात आली आहे.

जर मी पत्रकार परिषद घेतली तर या बीडच्या खासदाराची चड्डीसुद्धा जागेवर राहणारी नाही, या आशयाची पोस्ट पोलिस अधिकारी गणेश मुंडे यांनी केली होती. गणेश मुंडे हे बीडमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. बीड पोलिसांचा एक अधिकृत व्हाट्सअ‍ॅप ग्रुप आहे. या ग्रुपवर ही पोस्ट शेअर करण्यात आली होती. दरम्यान, बजरंग सोनवणे यांनीही याबाबत भाष्य केल्यानंतर ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर बजरंग सोनवणे यांनी या पोलिस अधिका-याचे देखील कॉल रेकॉर्ड चेक करावेत, अशी मागणी केली होती.

गणेश मुंडेंना ग्रुपमधून काढले
सहाय्यक पोलिस निरीक्षक असलेल्या गणेश मुंडेंनी अशा आशयाची पोस्ट केल्यानंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. दरम्यान पोलिस अधिका-यांच्या ग्रुपवरुन त्यांना काढून टाकण्यात आले होते. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वी बीडमधील पोलिस अधिका-याच्या चौकशीची मागणी केली होती. दरम्यान, गणेश मुंडेंनी त्यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट केल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बीडचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी चार दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील पोलिसांवर आरोप केले होते. सोनवणे यांनी बीड जिल्ह्यातील काही अधिका-याची मानवाधिकार आयोगाकडे केली होती. याशिवाय गणेश मुंडे आणि दहिफळे यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी देखील केली होती.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
11:29
Video thumbnail
Latur|पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या हस्ते एकमत कार्यालयातील गणरायाची आरती संपन्न
04:24
Video thumbnail
Nanded|बिलोलीत आयशर चालकाला बेदम मारहाण! VIDEO व्हायरल
01:12
Video thumbnail
Nanded|शिवणी आरोग्य केंद्रात डॉक्टरच नाहीत? 100-150 रुग्णांची गैरसोय
01:58
Video thumbnail
Latur|ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याची काँग्रेसची मागणी
05:21
Video thumbnail
Latur|लातूर जि.प. अध्यक्षांच्या बंगल्यात चोरी; पोलिसांसमोर मोठं आव्हान
06:55
Video thumbnail
Latur|पिकं संकटात, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न; छावा संघटनेचं उपोषण
10:32
Video thumbnail
Nanded|घंटानादाने सरकारला जागं करण्याचा प्रयत्न; नांदेडमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन
03:04
Video thumbnail
Nanded|दौरे नकोत, शेतकऱ्यांना मदत द्या’; रोहित पवारांची सरकारकडे मागणी
02:48
Video thumbnail
Latur|रेणापूर तालुक्यातील शेरा, समसापूर, गव्हाण येथे पिकांच्या नुकसानीची पाहणी
02:12
Video thumbnail
Nanded|पलंगावर झोपला अन् विषारी सापाने दंश केला; १७ वर्षीय रिहानचा मृत्यू
01:46
Video thumbnail
Dharashiv Rain Update|वाशीत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय, तेरखेड्यात गारपीट
01:20
Video thumbnail
Rohit Pawar|‘मोबाईलवर खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा’; रोहित पवारांचा संताप
05:26
Video thumbnail
Rohit Pawar|रोहित पवारांसमोर शेतकऱ्याचा हंबरडा; अश्रूंनी मांडली व्यथा
02:01
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांची आरती | Ekmat Digital
04:49

Latest news