19.3 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्र...तर आम्हाला भाजपमुक्त ‘जय श्रीराम’ करावा लागेल : उद्धव ठाकरे

…तर आम्हाला भाजपमुक्त ‘जय श्रीराम’ करावा लागेल : उद्धव ठाकरे

नाशिक : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात शिवसेनेच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, श्रीरामाला हायजॅक करण्याचा प्रयत्न करु नका, तो कोणत्याही एका पक्षाचा नाही. पण तुम्ही जर तसं करत असाल तर आम्हाला भाजपमुक्त जय श्रीराम करावा लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

आज श्रीरामाचे मुखवटे घालून जे काही रावण फिरत आहेत, त्यांचे मुखवटे फाडायचे आहेत. काल तिकडे सर्व अंधभक्त जमले होते त्यांचं जे काही ज्ञान आहे त्यांची बुद्धी आहे त्याचा आदर करतो मी. पण तिथं कोणीतरी एकानं म्हटलं की, आजचे शिवाजी महाराज म्हणजे आपले पंतप्रधान. अजिबात नाही, त्रिवार नाही. आज छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर आज राम मंदिर उभं राहुच शकलं नसतं.

कारण आज तुम्ही तिकडं जे काही जाऊन बसलात ते केवळ तेज महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलं म्हणूनच. अन्यथा हे कोणाही ये-यागबाळ्याचं काम नाही. म्हणूनच मी आज ठरवलंय की, या मातीत ते तेज जन्माला आलं आहे. आज मोदी अयोध्येला गेले, त्याआधी पंतप्रधान झाल्यानंतर कधी गेले नव्हते, त्यापूर्वी गेले असतील. पण मी शिवजन्मभूमीची माती घेऊन रामजन्मभूमीला २०१८ मध्ये नोव्हेंबरमध्ये गेलो होतो.

शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात जन्म घेतला त्यामुळं महाराष्ट्रानं देश वाचवला. औरंगजेबाला महाराष्ट्रानं मूठमाती दिली. जो जो महाराष्ट्रावर चाल करुन आला त्याला महाराष्ट्रानं मूठमाती दिली. पण आता रामाचे सगळे पुजारी म्हणताहेत आजचे शिवाजी महाराज म्हणजे आपले पंतप्रधान. प्रभू श्रीरामचंद्र हे कोणत्याही एका व्यक्तीची किंवा पक्षाची मालमत्ता नाही. पण तुम्ही जर असं करत असाल तर आम्हाला पण भाजपमुक्त ‘जय श्रीराम’ करावं लागेल असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR