22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeसोलापूरसोलापूर-पुणे, सोलापूर-सांगली प्रवास महागला

सोलापूर-पुणे, सोलापूर-सांगली प्रवास महागला

लोकसभा निवडणूक होताच टोलची दरवाढ जाहीर

सोलापूर : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातले मतदान शनिवारी पार पडले. यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवरील टोलचे नवे दर जाहीर केले. सोलापूर-पुणे, सोलापूर-सांगली, सोलापूर-विजापूर, सोलापूर-अक्कलकोट, सोलापूर-येडशी या मार्गावर कारचा, जीपचा प्रवास पाच रुपयांनी महागला आहे. गेल्या दहा वर्षांत टोलचे दर तिप्पट झाल्याचे दिसून येत आहेत. सोलापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गावर एकूण चार टोल नाके आहेत.

सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत वरवडे आणि सावळेश्वर हे दोन टोलनाके आहेत. या दोन्ही टोलनाक्यांवर कार आणि जीपच्या एका फेरीला ७० रुपये द्यावे लागायचे. ३ जूनपासून यासाठी ७५ रुपये द्यावे लागतील. मिनी बससाठी ११५ रुपये द्यावे लागायचे. आता १२० रुपये द्यावे लागणार आहेत. ट्रक आणि बससाठी २४५ रुपये द्यावे लागायचे. आता २५० रुपये द्यावे लागणार आहेत. २४ तासाच्या आत परतीच्या प्रवासाचे दरही १० रुपयांनी महागले आहेत.

सोलापूर ते येडशी महामार्गावर सोलापूर हद्दीत तामलवाडी टोलनाका आहे. या टोलनाक्यावर कार आणि जीपसाठी पूर्वी ९५ रुपये द्यावे लागायचे. ३ जूनपासून १०५ रुपये द्यावे लागतील. मिनी बस, ट्रक यांच्या दरातही पाच रुपयांनी वाढ झाली. सोलापूर- अक्कलकोट, सोलापूर-सांगली महामार्गावरील टोलनाक्यांवरही प्रत्येकी पाच रुपयांची वाढ झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR