सोलापूर : भारतीय खाद्य सुरक्षा व मानक प्राधिकरण अर्थात “एफएसएसएआई ने देशभरात ईट राइट चॅलेंज स्पर्धा घेतली असून, यात सोलापूरने ५४ गुण मिळवून देशात ३६ क्रमांकावर तर महाराष्ट्रात सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. खाद्य सुरक्षा संबंधित १३ प्रकारची काळजी घेऊन सोलापूरकरांनी मुंबई अन् पुण्यानंतर राज्यात सोलापूरचा डंका वाजवला आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत सोलापूरने दिल्लीलाही मागे टाकले आहे. दिल्लीला ४२.५ गुण मिळाले असून, देशात ६७व्या क्रमांकावर आहे. राज्यात मुंबई अन्नसुरक्षेत एक नंबर असून, पुणे तिसर्या क्रमांकावर आहे.इंदौरने देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे.
फूड सेप्टी अँड स्टैंडर्ड अॅथोरिटी ऑफ इंडिया अर्थात एफएसएसएआयईकडून दरवर्षी देशभरातील प्रमुख शहरातील खाद्य सुरक्षा संबंधित मानांकनांची तपासणी केली जाते. यंदा देशातील दोनशे शहरांत १३ प्रकारच्या घटकांची चाचणी केली जाते. मागच्या वर्षी देखील इंदौर देशात पहिल्या क्रमांकावर होता. यंदाही इंदोरने ७९ गुण मिळवून देशात नंबर वन राहिला आहे. विशेष म्हणजे, यात अहमदाबाद, सुरत, जम्मू काश्मीर यासारख्या मोठ्या शहरांना सोलापूरने मागे टाकले आहे. मुंबईला ७१ गुण मिळाले असून, राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर बेटर मुंबई ६७ गुण, पुणे ६४ गुण, नवी मुंबई ५७ गुण, ठाणे ५५ गुण, सोलापूर ५४ गुण, मीरा भाईंदरने ५९ गुण मिळवले आहे. या सर्वानंतर वर्धा, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नाशिक, सातारा या शहरांनीदेखील चांगले गुण मिळवून दोनशे शहरांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
अधिक माहिती देताना अन्न प्रशासन आयुक्त सुनील जिंदूरकर यांनी सांगितले, फूड दुकानदारांचा परवाना, हॉटेलातील स्वचाता, सव्हिलान्स ड्राइव्ह, ईट राइट निरीक्षण, रस्त्यावरील स्वच्छ अन्न, अन्न प्रशासनाच्या सूचना, ईट राइट कॅम्पस, मिलेट्स यात्रा, ईंट राइट वॉकेथॉन, इंट राइट स्कूल, ईट राइट स्टेशन यासारखे तेरा प्रकारचे निकष पूर्ण करण्यात सोलापुरातील दुकानदारांनी विशेष काळजी घेतली आहे. दरवषीं या निकषांची तपासणी केली जाते. यंदा सोलापूरने देशात ३६या क्रमांक पटकावला आहे.