32.5 C
Latur
Friday, April 4, 2025
Homeसोलापूरआनंदाचा शिधा वाटपात सोलापूरला विभागात अव्वल तर राज्यात तिसरे स्थान

आनंदाचा शिधा वाटपात सोलापूरला विभागात अव्वल तर राज्यात तिसरे स्थान

सोलापूर : आनंदाचा शिधा वाटपात सोलापूरने राज्यात आघाडी घेतली असून, आतापर्यंत ६६ टक्के आनंदाचा शिधा वाटप झाले आहे. शिधा वाटपात शहर विभागाने पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळविला असून, राज्यात शहर विभागाने तिसऱ्या क्रमांकावर आहे.

१लाख १८ हजार शिधापत्रिकाधारकांपैकी आतापर्यंत ७८ हजार ७८८ लाभार्थीना आनंदाचा शिधा मिळालेला आहे. उर्वरित लाभार्थीनाही शिधा वाटपासाठी शहर विभागाने नियोजनरीत्या काम सुरू केले आहे. यास लाभार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. श्रीराम प्राणप्रतिष्ठा व श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राज्य शासनाकडून आनंदाचा शिधा वाटप सुरू आहे. वाटपात तत्परता दाखवून शहर विभागाने राज्यात आघाडी घेतलीआहे.

जिल्हा पुरवठा विभागाने आतापर्यंत ५८ टक्के आनंदाचा शिधा वाटप केला असून, राज्यात दहाव्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात एकूण ४लाख ११ हजार लाभार्थी असून, यापैकी२ लाख ३८ हजार लाभार्थ्यांना शिधा वाटप करण्यात आला. आनंदाचाशिधा वाटपात यवतमाळ राज्यात एक नंबर असून, यवतमाळमध्ये ६९टक्के वाटप झाले आहे. नाशिक दुसऱ्या क्रमांकावर, तर सोलापूरतिसऱ्या नंबरवर आहे.श्रीराम प्राणप्रतिष्ठा व शिवजयंतीनिमित्त सध्या आनंदाचा शिधा वाटप होत आहे. लाभार्थ्यांना फोन करून शिधा घेऊन जाण्यासाठी आवाहन करीत आहोत. यास लाभार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.असे सोलापूर शहर अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR