35.5 C
Latur
Tuesday, April 16, 2024
Homeसोलापूरआरबीएल बँकेचे एटीएम सील, मिळकतकर वसुलीपोटी कारवाई

आरबीएल बँकेचे एटीएम सील, मिळकतकर वसुलीपोटी कारवाई

सोलापूर : महापालिकेच्या वसुली पथकांकडून मिळकत करापोटी रेल्वे लाईन येथील आरबीएल बँकेचे एटीएम सेंटर सील करण्यात आले. दिवसभरात विविध पथकांकडून एकूण १ कोटी ६८ लाख ७८ हजार ८७७ रुपये मिळकत कर वसूल करण्यात आला आहे.

महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकाच्या माध्यमातून मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी सील व नळ बंद कारवाई तसेच थकबाकीदारांच्या घरासमोर हलगी नाद मोहीम सुरू आहे. महापालिकेच्या मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी गेल्या ३० दिवसांपासून कारवाई वसुली मोहीम राबविण्यात येत आहे.

थकबाकी पोटी शहरातील रेल्वे लाईन भागातील आरबीएल बँकेकडे असलेल्या १५ लाख १३ हजार ४७४ रुपये थकबाकी पोटी एटीएम सेंटर सील करण्यात आले. दिवसभरात विविध वसुली पथकांनी रोख, धनादेश व आरटीजीएस असे सर्व मिळून एकूण १ कोटी ६८ लाख ७८ हजार ८७७ रुपये मिळकत कर वसूल केला.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR