सोलर-पवनचक्की प्रकल्प साहित्य चोरीचा पर्दाफाश

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या सोलर व पवनचक्की प्रकल्पातील साहित्याची चोरी होण्याच्या घटना मागील अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. त्यातील १० गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. रविवारी (दि.७) २ आरोपींना येडशी येथून मुद्देमालासह पकडण्यात आले आहे. यावेळी त्यांच्याकडून १९५ किलो तांब्याच्या तारासह टाटा सुमो गाडी असा ६ लाख ४२ हजार ४०० रूपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

धाराशिव जिल्हयातील सोलार प्लॅट व पचनचक्कीचे संबंधीत असणा-या प्रकल्पातून तेथील साहित्य, वायर, चोरीस जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले होते. अशाच प्रकारचे काही गुन्हे धाराशिव गुन्हे अभिलेखावर नोंद असल्याने व सदरचे गुन्हे अतिसंवेदनशील व गंभीर स्वरूपाचे असल्याने पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोनि विनोद इज्जपवार यांना आदेशित केले होते. त्यानुसार रविवारी (दि.७) स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक यांनी गोपनीय बातमीदार यांचेकडून प्राप्त माहितीवरून येडशी (ता. जि धाराशिव) येथून ०२ संशयित इसमांना त्यांचे टाटा सुमो वाहनासह शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांचे अन्य साथीदारांचे सोबत मिळून चोरी केली असल्याचे कबूल केले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून एकूण १९५ किलो वजनाच्या तांब्याच्या तारा व गुन्हयात वापरलेली टाटा सुमो असा एकूण ०६,४२,४०० रूपयांचा मुददेमाल ताब्यात घेण्यात आला आहे. नमुद आरोपींकडून चोरीचे एकूण १० गुन्हे उघडकीस आले आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शिवाजी उर्फ नाना संजय काळे रा खामकर पारधी पेढी, ता वाशी, जि धाराशिव व अन्य एक विधीसंघर्षग्रस्त बालक अशी असून नमुद आरोपी व जप्त मुददेमाल पुढील कारवाईस्तव पोस्टे धाराशिव ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोह शौकत पठाण, पोह प्रकाश औताडे, पोह जावेद काझी, पोह फरहान पठाण, पोकॉ १०२९ कोळी, चापोह रत्नदिप डोंगरे, नागनाथ गुरव यांचे पथकाने केली आहे.

या ठिकाणाहून केली चोरी
या चोरट्यांनी धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या तेरखेडा (ता. वाशी), रूईभर, कौडगाव, ढोकी, साबळेवाडी (ता. धाराशिव) व आरसोली (ता. भूम), गौरगाव व मस्सा (ता. कळंब) या शिवारात सोलर तसेच पवनचक्की प्लांटवरील तांब्याच्या तारा व केबलची चोरी केल्याचे सांगितले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news