30.6 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeमहाराष्ट्रगुलामगिरी स्वीकारलेल्यांचे सोमे-गोमे दिल्लीत

गुलामगिरी स्वीकारलेल्यांचे सोमे-गोमे दिल्लीत

संजय राऊतांचा अजित पवारांना सणसणीत टोला

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शेतकरी आक्रोश मोर्चात शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीका केली होती तसेच त्यांची नक्कलही केली होती. मात्र, आज अजित पवारांनी मी सोम्या-गोम्यांना उत्तर देत नाही असे म्हणत राऊतांवर पलटवार केला होता. अजित पवारांच्या या व्यक्तव्यावर संजय राऊतांनी सणसणीत टोला लगावला आहे. तसेच आगामी निवडणुकींच्या जागावाटपावरही भाष्य केले आहे.

अजित पवारांचे सोमे आणि गोमे दिल्लीत आहेत. ज्यांनी गुलामी पत्करली आहे किंवा जे डरपोक आहेत त्यांनी आमच्यावर बोलूच नये. सोमे-गोमे कोण आहेत हे २०२४ ला कळेल असे संजय राऊत म्हणाले. या महाराष्ट्रावर दिल्लीतून आक्रमण होत असताना, महाराष्ट्राचे उद्योग पळविले जात असताना, रोजगार पळविला जात असताना सध्याच्या सरकारमधील हौशे-नवशे हे तोंडाला कुलुप लावून गप्प बसले आहेत त्यांना आमच्यावर बोलण्याचा अधिकार नाही असे राऊत म्हणाले.

महाराष्ट्रातील उद्योग पळविले जात असताना सत्ताधारी डोळ्यांवर कातडे आणि तोंडाला कुलुप लावून बसले आहेत. इतकं नामर्द सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या इतिहासात झालेले नाहीत. डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटला जातो आहे, मुंबई तोडली जात आहे तरी आम्ही तुरुंगात जाऊ या भयाने ते लटपटत आहेत अशी टीका संजय राऊत यांनी सत्ताधा-यांवर केली आहे.

महाराष्ट्र लुटण्यासाठी ठाकरे सरकार पाडले
महाराष्ट्र लुटण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले असा आरोप राऊत यांनी केला. आमदार आणि खासदारांना फक्त महाराष्ट्राची लुट करण्यासाठी फोडण्यात आले. पंतप्रधान हे सगळ्या देशाचे असतात. पण ज्याप्रकारे महाराष्ट्र आणि इतर राज्यांतून मोठे-मोठे प्रकल्प फक्त गुजरातला पळविले जात आहेत. याला विकास नाही तर दरोडा म्हणतात असे म्हणत राऊतांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR